अतिक्रमण विभागाला अरेरावी : दोघांना अटक


जळगाव : शहरातील शनीपेठ परीसरात कारवाई करत असतांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला अरेरावीची भाषा व शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख दोन्ही (रा.काट्याफाईल) या दोघांना अटक करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील शनीपेठ परीसरात घाणेकर चौकातील ओक मंगल कार्यालय येथे रस्त्यावर भाजीपाला विके्रत्यांना भाजीपाला न विकण्याचे सांगितले. त्यांनी काही भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर लावलेले दुकाने बंद करून निघून गेले. मात्र शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख दोन्ही रा. काट्या फायईल, शनीपेठ यांनी अतिक्रमण विभागाशी वाद घातला. आरेरावीची भाषा केल्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अतिक्रमण विभागाचे मनपा कर्मचारी ज्ञानेश्वर तुकाराम कोळी यांच्या फिर्यादीवरून शेख फारूख शेख यासीन आणि तौफिक शेख फारूख यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली आरोपींना अटक
अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, सलिम पिंजारी, रविंद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहुल धेटे, राहुल पाटील यांनी कारवाई करत दोघांना आज अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !