नगरसेवक परीषदेच्या जळगाव जिल्हा महिलाध्यक्षपदी संगीता देशमुख
भुसावळ : नगरसेवक परीषद, मुंबई महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा महिलाध्यक्षपदी नगरसेविका संगीता प्रदीप देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली. परीषदेचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे ही निवड केली आहे. राज्यातील महानगरपालिका नगरपालिका व नगर पंचायतीत 24 तास समाजासाठी काम करणार्या राज्यातील नगरसेवक व नगरसेविका यांचा सन्मान नगरसेवक परीषदेतर्फे केला जात आहे असून आतापर्यंत राज्यातील 24 जिल्ह्यात कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. निवडीनंतर नगरसेविका संगीता प्रदीप देशमुख यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

