वराडसीम आरोग्य केंद्राला सॅनिटायझरसह मास्क व ऑक्सीमीटर भेट
श्री विनायक फाउंडेशनचा उपक्रम : जि.प.सदस्य पल्लवी सावकारेंची उपस्थिती
भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला श्री विनायक फाउंडेशनतर्फे बुधवारी सॅनेटायझर, हॅण्ड ग्लोज, मास्क व पल्स ऑक्सिमीटर जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांच्याहस्ते देण्यात आले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष टिंन्केश चौधरी, डॉ.प्रमोद पांढरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णांवर उपचारासाठी होणार सोय
वराडसीम आरोग्य केंद्रास श्री विनायक फाउंडेशनतर्फे बुधवारी 400 मास्क, 200 हॅण्ड ग्लोज तसेच दोन ऑक्सीमीटरसह दहा लीटर सॅनिटायझर देण्यात आले. कोरोनाच्या कठीण काळात आरोग्य केंद्रात विविध आजारांसाठी उपचारार्थ येणार्या रुग्णांना या साहित्यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.


