किसान-पार्सल गाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


रेल्वे प्रशासनाचा गाडीला वाढता प्रतिसाद पाहून निर्णय : लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ : आवश्यक साधन सामुग्रीचे वहन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान पार्सल गाडीसह शालिमार पार्सल गाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शेतकर्‍यांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच साधन-सामग्री पाठवण्यासाठी जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुंबई-शालिमार गाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई-शालिमार पार्सल गाडीला 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या लोकांना वा व्यावसायीकांना जी काही साधन सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळच्या स्टेशनवर मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.गाडी क्रमांक 00113 डाऊन पार्सल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 31 ि2डसेंबर 2020 पर्यंत दररोज 10.35 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 11.35 वाजता शालिमार येथे पोहोचणार आहे. गाडी 00114 विशेष पार्सल गाडी डिसेंबरपर्यंत 9.25 वाजता शालिमार येथून सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे 11 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाशकुडा, मेचेदा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

किसान पार्सल गाडीलाही मुदतवाढ
शेतकर्‍यांच्या वाढत्या प्रतिसादानंतर देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडीलाही 31 डिसेंबरपर्यंत मुदवाढत देण्यात आली. आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. डाऊन 00107 देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी मंगळवार, गुरुवार व शनिवारी देवळाली स्थानकावरून सहा वाजता सुटल्यानंतर रविवारी पहाटे 04.45 वाजता मुजफ्फरपुर स्टेशनवर पोहोचणार आहे. अप 00108 मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक सोमवार, गुरुवार व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन आठ वाजता सुटल्यानंतर सोमवारी 5.45 वाजता देवळालीला पोहोचल.

शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा
शेतकर्‍यांनी त्यांचा माल बुक करण्यासाठी जवळच्या पार्सल कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच येताना आधारकार्डाची प्रत सोबत आणावी तसेच शेतकरी, कार्गो अ‍ॅग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !