रावेरात मराठा समाज आरक्षणाबाबत प्रशासनाला देणार निवेदन
रावेर : मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळण्यासंदर्भात रावेरात नुकतीच मराठा समाजाची महत्वाची बैठक झाली. यावेळी पुढील आंदोलना संदर्भात विचार विनीमय करण्यात आला. बैठकीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता समस्त मराठा समाजाच्यातर्फे प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला मराठा समाजाचे डॉ.एस.आर.पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नीळकंठ चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी बिग्रेड तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील, योगेश पाटील, कडू पाटील, प्रवीण पंडीत, जे.के.पाटील, सी.एस.पाटील, सचिन पाटील, गोंडू महाजन, गणेश चौधरी, जयेश पाटील यांच्यासह मोठ्या संखेने मराठा समाजबांधव उपस्थित होते. शुक्रवारी मराठा बांधवांनी रावेर कृषी उपन्न बाजार समितीत उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.


