माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी व मुक्ती फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथील पोलिस मंगल कार्यालयात महाआरोग्य शिबिर तर वराडे आयटीआयमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 785 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले.दोन्ही शिबिरांचे 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.पाटील, जे स्कूलचे प्राचार्य आर.पी.पाटील, आयटीआयचे प्राचार्य सुजीत पाटील, खामखेडा येथील माजी सरपंच चंद्रकांत भोलाणे, मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष व चेअरमन अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शिबिरास भेट दिली. रक्तदान शिबिरासाठी नाथाभाऊंच्या 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यांचे शिबिरासाठी परीश्रम
या सर्व शिबिरांसाठी डॉ.बिराजदार, रवी महाजन, नाक कान घसा तज्ञ डॉ.अनिल श्रीवास्तव, डॉ.गौरव नेमाडे, डॉ.चेतन पावरा, जनरल सर्जन डॉ.उमंग अग्रवाल, अस्थिरोग तज्ञ डॉ.धीरज जोडी, दंतरोग तज्ञ डॉ.हर्षल पाटील, डॉ.तेजश्री पाटील, डॉ.प्रीतम पटेल, डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील, डॉ.हेमंत देवरे या तज्ज्ञांनी परीश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वितेसाठी खडसे महाविद्यालयाचे प्राध्यापक, मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.