धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील ‘त्या’ लाचखोर लिपिकाची पोलिस कोठडीत रवानगी
धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले (38) यांना पाच हजारांची लाच घेताना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली होती. आरोपीला गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. धुळे जिल्हा पोलिस दलातील 52 वर्षीय तक्रारदार यांना बडतर्फ कालावधीतील पुरवणी बिल 13 लाख 72 हजार 623 रुपये मंजूर करून दिल्याच्या प्रक्रियेत सहाय्य करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच 23 रोजी आरोपीने मागितल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर आरोपीने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी आरोपीला धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण करीत आहेत.

