जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 443 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 45 हजार 872 वर : 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी 443 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 45 हजार 872 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1137 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात तब्बल 783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 114
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 53
अमळनेर 41
चोपडा 43
पाचोरा 14
भडगाव 10
धरणगाव 07
यावल 25
एरंडोल 12
जामनेर 19
रावेर 33
पारोळा 11
चाळीसगाव 38
मुक्ताईनगर 04
बोदवड 12
अन्य जिल्हा 01


