बोदवडला विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक


बोदवड : शहरातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी कैलास सीताराम माळी (31, माळी गल्ली, बोदवड) विरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 23 रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोदवड शहरातील रेणुका माता मंदिराजवळ सार्वजनिक रस्त्यावर आरोपीने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आरोप आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून 23 रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !