आदिवासी विभागाच्या योजनेसाठी आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन


लाभार्थींकडून संघटनांसह व्यक्तींकडून लूट होत असल्याचा तक्रारी

यावल : आदिवासी विभागाच्या खावटी काम अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती, संघटना लाभार्थींकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत मात्र लाभार्थींनी अर्ज प्राप्त करण्यासाठी अशा कोणत्याही अनुषंगाने अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

कार्यालयाशी संपर्काचे आवाहन
अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना सहाय्य करण्यासाठी करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नजीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या 9 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाने केले आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित आदिवासी जमातीच्या कुटुंबीयांना लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थींनी करावयाचे अर्ज, पोचपावती, प्रकल्प नोंदवह्या आदी बाबीचे नमुने तयार करण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे. मात्र काही संघटना वा व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्थींनी करीत असल्याच्या तक्रारी असून ही बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे.अनुसूचित जमातीच्या लाभार्थींनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाजगी अमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महांमडळ मर्या., उपप्रादेशिक कार्यालय, यावल, जि.जळगाव आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !