सर्वेक्षण करणार्‍या टीमला नागरीकांनी द्यावा प्रतिसाद


रामसिंग सुलाने : प्रांताधिकारी यांनी प्रत्यक्ष कुटुंबाच्या भेटी घेतल्या

वरणगाव : शहरामध्ये 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक रामसिंग सुलाने यांनी भेट देऊन नागरीकांशी चर्चा केली व घरी येणार्‍या सर्वेक्षण टीमला माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. वरणगाव शहरामध्ये 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आजपर्यंत आठ टीमच्या माध्यमातून चार हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पाच हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

प्रांताधिकार्‍यांनी भेट देत केली पाहणी
या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी भुसावळ तालुक्याचे प्रांताधिकारी तथा वरणगाव नगरपालिकेचे प्रशासक रामसिंग सुलाने यांनी भेट दिली. यावेळी सर्वेक्षण करणार्‍या टीम सोबत त्यांनी कुटुंबांच्या भेटी घेतल्या तसेच शहरातील दवाखान्यामध्ये भेटी घेऊन वैद्यकीय सेवा करणार्‍या डॉक्टरांशी चर्चा केली तसेच येणार्‍या अडचणी समजून घेतल्या व नागरीकांना आपल्या घरातील कुटुंब सदस्यांची सत्य माहिती सर्वेक्षण टीम कडे देण्याचे आवाहनही करण्यात आले. यामध्ये कुटुंब सदस्यांची ऑक्सिजन लेव्ह, बीपी, शुगर यासह विविध आजारांची माहिती एकत्र केली जात आहे तसेच त्रास होत असल्यास तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून टेस्ट करून घेतल्यास वेळेत उपचार सुरू होऊन रुग्ण लवकर बरा होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन रामसिंग सुलाने यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी, आरोग्य सेविका सी.जी.भोळे, आरोग्यसेवक पी.पी.माळी, पर्यवेक्षक कल्पना भंगाळे, आशा वर्कर आशा सुरवाडे, सीमा मोरे, आशा सोनवणे, निर्मला चौधरी आदी उपस्थित होत्या.

आई हॉस्पिटलला भेट
सर्वेक्षणावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी शहरातील आई हॉस्पिटल चे स्त्रीरोग तज्ञ डॉ.विनोद चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रुग्णांच्या ठेवण्यात येणार्‍या नोंदी तसेच तपासणीवेळी येणार्‍या अडचणी यासह विविध विषयांवर ती चर्चा केली तसेच कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबतदेखील यावेळी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !