राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे पुरनाड फाट्यावर ठिय्या आंदोलन


केळी उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी अडीच लाख मदतीची मागणी

मुक्ताईनगर : कोरोनामुळे आधीच हाता-तोंडाशी आलेला केळी माल हा कवडीमोल भावात विकावा लागला आणि आता त्यात भर म्हणून सीएमव्ही व्हायरसमुळे लागवडीखालील केळी पीक पूर्णपणे उपटून फेकावे लागत आहे. केळी उत्पादक शेतकरी हा दुहेरी आर्थिक संकटात सापडला असतानाच केंद्र सरकारने शेतकरी विरोधी बिल पास करून शेतकर्‍यांना कचाट्यात पकडले आहे. चार-पाच बड्या उद्योगांच्या हातामध्ये संपूर्ण शेतकर्‍यांचा माल देऊन शेतकरी संपवण्याचा घाट हा केंद्र सरकारने घातल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पुरनाड फाट्यावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या मागण्यांसाठी आंदोलन
केळी उत्पादक शेतकर्‍याला हेक्टरी अडीच लाखांची मदत द्यावी, केळी करपा किट पूर्वरत सुरू करावे, केळी विमा तत्काळ मंजूर करावा, कापूस उत्पादकांना मदत मिळावी, शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन रद्द करावे, शेती रस्त्यांसाठी स्वतंत्र हेड निर्माण करून आर्थिक तरतूद करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पंचायत समिती सदस्य किशोर पाटील, तालुका युवक अध्यक्ष सईद खान, उपाध्यक्ष राजेश ढोले, जिल्हा सरचिटणीस प्रवीण दामोदरे, विजय पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, प्रदीप पाटील, पवन कोळी, राहुल पाटील, मनोज पाटील, दशरत कोंडे, विशाल पाटील, साहेबराव पाटील, व्ही.एस.पाटील, संतोष पाटील, मोहन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भोला पाटील, सारंग पाटील, धीरज धनगर, संदीप धनगर, मुळा पाटील, रवी सुरवाडे, वैभव पाटील, नितीन पाटील, साहेबराव पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, हर्षल पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !