रावेरात धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन


धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गाचा दाखला मिळण्याची मागणी

रावेर : धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गाचा दाखला मिळावा या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे रावेर तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना निवेदन दिले. याप्रसंगी धनगर संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष लखन सावळे, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, अ‍ॅड.भास्कर निळे, गणेश बोरसे, प्रवीण अजलसोंडे, वासुदेव सावळे, रमेश वैदकर, मोहन बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !