मराठा समाजावरील आरक्षण स्थगिती उठवा : रावेरात निवेदन
रावेर : मराठा समाज आरक्षणावर लावलेली स्थगिती त्वरीत उठवावी यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदारांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
अशा आहेत मागण्या
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती त्वरीत उठविण्यात यावी, चालू आर्थिक वर्षातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा राज्य सरकारने करावा, केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा, राज्य सरकारने सुरु केलेल्या मेगा भरतीला स्थगिती देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 100 कोटींची तरतूद करावी, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे कुटुंबाचे पुनर्वसन करावे, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, राज्यातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करावी, मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी या मागण्या रावेर तालुका सकल मराठा समाजातर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सी.जी.पवार यांनी स्वीकारले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मराठा समाज मंडळाचे संचालक कडू पाटील, वामनराव पाटील, अंबादास महाजन, बाजार समितीचे संचालक नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, रवींद्र चौधरी, घनश्याम पाटील, जे.के.पाटील, सी.एस.पाटील, प्रशांत पाटील, योगेश महाजन, गणेश महाजन, किशोर पाटील, पितांबर पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

