जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 403 रुग्ण आढळले


बाधीत रुग्णांपेक्षा बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ : जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 46 हजार 275 वर

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी 403 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 46 हजार 275 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1145 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 36 हजार 781 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 820 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 91
जळगाव ग्रामीण 13
भुसावळ 66
अमळनेर 29
चोपडा 30
पाचोरा 02
भडगाव 04
धरणगाव 20
यावल 33
एरंडोल 21
जामनेर 18
रावेर 07
पारोळा 24
चाळीसगाव 25
मुक्ताईनगर 10
बोदवड 05
अन्य जिल्हा 05




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !