भुसावळात महिलेची छेड काढली : शेगावच्या एकाविरुद्ध गुन्हा


भुसावळ : पती-पत्नीत झालेल्या वादानंतर शेगावातील इसमाने मध्यस्थीची भूमिका निभावली मात्र या दरम्यान या इसमाने महिलेशी संपर्क साधत मंगळवार, 22 रोजी रात्री नऊ वाजता आरोपीने महिलेची छेड काढल्याची घटना शहरात घडल्याने या प्रकरणी शेगावातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास श्रीराम सुलताने (शेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. वरणगाव रोडवरील एक महिला तिच्या पतीचे आणि तिच्यात वाद झाल्यानंतर त्यांच्या समाजातील शेगाव येथील कैलास सुलताने याने मध्यस्थाची भूमिका निभावली होती तर त्यानंतर आरोपीने 22 रोजी महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. महिलेने गुरूवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत कैलास श्रीराम सुलताने (रा. शेगाव) विरूध्द तक्रार दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !