रावेरात सायकल चोरी प्रकरणी कर्जोदच्या आरोपीला अटक


रावेर : बाजार करण्यासाठी आलेल्या तरुणाची सायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील एकास रावेर पोलिसांनी अटक केली आहे. विजय दिनकर महाजन (35, कर्जोद, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार सौरभ श्रीकृष्ण पाटील (शिंदखेड, ता.रावेर) हे रावेर शहरात बाजार घेण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी सायकलने आले असता त्यांनी सायकल एका ठिकाणी लावल्यानंतर चोरट्यांनी त्यांची सायकल लांबवली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथक तयार केले. ईस्माईल शेख, तुषार मोरे, मनोज म्हस्के, महेंद्र सुरवाडे यांनी कारवाई संशयीत आरोपी विजय महाजन याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने सायकल चोरीची कबुली दिली. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !