जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 467 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 46 हजार 742 वर
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी 467 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 46 हजार 742 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1155 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 552 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, शनिवारी एकाच दिवसात तब्बल 771 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 184
जळगाव ग्रामीण 18
भुसावळ 30
अमळनेर 39
चोपडा 18
पाचोरा 17
भडगाव 27
धरणगाव 05
यावल 07
एरंडोल 05
जामनेर 32
रावेर 30
पारोळा 25
चाळीसगाव 08
मुक्ताईनगर 10
बोदवड 10
अन्य जिल्हा 02


