भाटखेडा येथे तरुणावर कुर्‍हाडीने हल्ला


रावेर : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणावर कुर्‍हाडीने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भाटखेडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपीस अटक करण्यात आलीव न्यायालयाज हजर केले असता 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कुर्‍हाडीने डोक्यावर केला वार
तालुक्यातील भाटखेडा येथील रहिवासी गोकुळ भास्कर गांगवे (25) याने दुचाकीने कट मारल्याने त्याचा राग येवून संशयीत आरोपी अशोक तुळशीराम चौधरी (52, रा.भाटखेडा, ता.रावेर ) याने शिवीगाळ करीत जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली तर गोकुळ गांगवे हा तरूण बाहेर शौचास गेल्याचे पाहून संशयीत आरोपी अशोक चौधरी याने कुन्हाडीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जखमी तरुणाचे वडील भास्कर रघुनाथ गांगवे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात अशोक चौधरी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपी अशोक चौधरी याला शुक्रवारी उशीरा अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले असता 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !