रेल्वे प्रवाशांसाठी सहा गाड्या
प्रवाशांची गैरसोय टळणार : भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना दिलासा
भुसावळ : रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता गर्दी कमी करण्यासाठी नव्याने सहा रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. भुसावळ विभागातून या गाड्या धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रविवारपासून या गाड्यांचे ऑनलाईन बुकींग सुरू होणार असून शिवाय आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार असून रेल्वे प्रवाशांना मास्क लावणे, सोशल डिस्टन्स बाळगणे तसेच सॅनिटायझर बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाड़ी
डाउन 05064 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूरही गाडी 29 सप्टेंबरपासून
पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 04.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, हबीबगंज, विदिशा, झाँसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बलरामपूर, झारखंडी, तुलसीपूर, बरहनी, शोहरतगढ, नौगढ, आनंद नगर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05063 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 28 सप्टेंबरपासून
पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.30 वाजता प्रस्थान करून तिसर्या दिवशी चार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला खंडवा व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पनवेल-गोरखपूर विशेष गाड़ी
डाऊन 05066 पनवेल-गोरखपूर ही गाडी 30 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 4.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. या गाडीला नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, हबीबगंज, विदिशा, झाँसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बलरामपूर, झारखंडी, तुलसीपूर, बरहनी, शोहरतगढ, नौगढ, आनंद नगर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05063 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस 28 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 4.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला खंडवा व भुसावळ, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
बांद्रा टर्मिनस-गोरखपूर विशेष गाड़ी
डाऊन 05068 बांद्रा टर्मिनस-गोरखपूर ही गाडी 2 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.20 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 5.55 वाजता गोरखपूला पोहचेल. या गाडीला जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, हबीबगंज, विदिशा, झाँसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बलरामपूर, झारखंडी, तुलसीपुर, बरहनी, शोहरतगढ, नौगढ, आनंद नगर या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05067 गोरखपूर-बांद्रा टर्मिनस 30 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 5.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 7.10 वाजता बांद्रा टर्मिनसला पोहचेल. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वापी, बोरीवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

