जलवाहिनी बिघाडामुळे नवीन काँक्रिट रस्त्याचे वाजले बारा
बोदवड नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराने संताप
बोदवड : शहरात नगरपंचायतीने नुकतेच प्रभाग 14 व 15 या सीमेलगत जाणार्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुमारे 20 दिवसांपूर्वी केले मा9 रस्त्याच्या खालून गेलेली या भागातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण असल्याने ती दुरुसतीसाठी रस्ता जेसीबी खोदल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. 17 फेब्रुवारी 2020 रोजी शहरातील सुज्ञ नागरीकांरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना शहरातील ग्रामपंचायत काळातील पाणीपुरवठा करणारी जीर्ण जलवाहिनी रस्ते काँक्रीटीकरणापूर्वी बदलण्यासंदर्भात निवेदन दिले होते मात्र नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने शासन निधीचा अपव्यय झाला आहे.
काँक्रिटीकरणानंतर बिल अदा करणार
मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पाणी ही अत्यावश्यक सेवा असून जलवाहिनीचे काम केल्यानंतर खोदलेला रस्ता परत काँक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्याचे बिल अदा केले जाईल, असेही ते म्हणाले.


