भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणारा आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरात घोडेपीर बाबा दर्गा परीसरात तलवारीच्या धाकावर एक संशयीत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत निलेश उर्फ गोलू जय सपकाळे (22, रा.शिवपूर कन्हाळा, ता.भुसावळ) यास अटक केली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली तर संशयीताच्या ताब्यातून एक हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. आरोपीविरु8द्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, हवालदार अयाज सैय्यद, नाईक किशोर महाजन, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींच्या पथकाने केली.

