भुसावळातील गुन्हेगारीवर आहे ‘त्या’ यंत्रणेच्या प्रभावी वापरातून नियंत्रण


नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे : भुसावळात सरप्राईज व्हिजिट

भुसावळ : शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कुठल्याही नवीन पथकाची नेमणूक केली जाणार नाही मात्र आहे त्या यंत्रणेचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी निश्‍चित नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्‍वास जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे व्यक्त केला. जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर सोमवारी प्रथमच त्यांनी भुसावळला भेट देत शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांची बैठक घेत गुन्हेगारीचा आढावा जाणून घेतला.

गावठी कट्ट्यांचे मध्यप्रदेश कनेक्शन
डॉ.मुंढे म्हणाले की, भुसावळात सातत्याने आढळणारे गावठे कट्टे पाहता गतवर्षाचा व यंदाचा आढावा घेवून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे शिवाय गावठे कट्टे हे मध्यप्रदेशातून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता विशेष लक्ष घातले जाणार आहे. शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे, त्यातील तपासाची दिशा तसेच अटकेतील आरोपी तसेच हद्दपार आरोपींबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !