किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोना मुक्तीकडे वाटचाल


किनगाव : कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव येथे नुकतीच 76 ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली व सर्व ग्रामस्थांचे अहवाल निगेटीव्ह आले. शिबिराचे उद्घाटन आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना कोरोनाची भीती ना बाळगता जास्तीत-जास्त प्रमाणात चाचणी करून कोरोना समूळपणे नष्ट करून करण्याचे आवाहन केले.

लक्षण असणार्‍या ग्रामस्थांची चाचणी
किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांनी किनगाव कोरोना मुक्त करण्यासाठी सतत आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका यांच्या मदतीने प्रत्येक घरातून रुग्ण तपासणी करून त्यांना काही लक्षणे असल्यास त्यांच्या चाचणीसाठी आरोग्य केंद्रात आणले जात आहे आणि लगेच 30 मिनिटात त्यांचा अहवाल पण दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर यांची झूम मिटिंगद्वारे कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते आहे आणि रोज त्यांच्या संपर्कात राहून कामाचा अहवाल घेतला जात आहे, असे डॉ.महाजन यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरात किनागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे 30 हजार ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिवाय या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे डॉ.महाजन यांनी सांगितले. हे सर्व काम कोरोना योद्धा म्हणून काम करणार्‍या प्रत्येक आरोग्य कर्मचार्‍यांमुळे होत आहे आणि त्यांच्याकडून डॉ.महाजन या काम करून घेत असल्याचे आमदार लता सोनवणे म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, कृषी उत्त्पन्न बाजार समिती अध्यक्ष मुन्ना भाऊ, गटविकास अधिकारी निलेश पाटील, तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका आरोग्य अधिकारी हेमंतकुमार बर्‍हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी किनगाव डॉ.मनिषा महाजन आणि डॉ. सागर वारके, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !