विशेष पार्सल गाड्यांचे चार महिने आधी बुकींग करता येणार


भुसावळ : रेल्वे प्रशासनाने आता व्यापारी व व्यावसायीकांना दिलासा देण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांचे 120 दिवस आधी बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत व्यापारी आपले पार्सल यातायात पाठवण्यासाठी 120 दिवस आधी आरक्षित करू शकता तसेच पार्सल भाड्याच्या 10 टक्के रक्कम भरून पार्सलकरीता स्थान आरक्षित करता येणार आहे शिवाय बाकी 90 टक्के पार्सल भाडे गाडीच्या निर्धारीत सुटण्याच्या 72 तास अगोदर भरावे लागणार आहे. जर ग्राहक गाडीच्या निर्धारीत सुटण्याच्या 72 तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर पार्सलची अग्रिम बुकिंग रद्द करण्यात येईल आणि अग्रिम पार्सल भाडे भरलेले 10 टक्के जप्त केले जाईल, असेही रेल्वेने कळवले आहे. याच प्रकारे विशेष यात्री गाडी तथा विशेष पार्सल गाडीत मागणीनुसार पार्सलयानची बुकिंग देखील 120 दिवस आधी बुक करता येणार आहे. याकरिता वैगन पंजीकरण शुल्क भरावे लागणार आहे.

72 तासांपूर्वी रद्द करता येईल बुकिंग
जर पार्सलसाठी बुक केलेली जागा रद्द करावयाची असेल तर गाडी सुटण्याच्या 72 तास आधी रद्द करता येईल. अशा परीरस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम परत मिळेल परंतु 72 तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनाद्वारा गाडी रद्द झाली ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल. व्यापारी, व्यावसायिक व शेतकर्‍यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि रेल्वेद्वारे पार्सल बुकिंग करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !