भुसावळातील पुर्नवसन झालेल्या घरांचे विस्थापन होणार नाही


भुसावळात प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे विस्थापीतांना आश्‍वासन

भुसावळ : नगरपालिका दवाखाना सर्वे क्रमांक 175 नाहाटा चौफुलीवरील अतिरीक्त जागेचे संपादन करताना भारत मिल सर्वे क्रमांक 150 मधील पूर्नवर्सन झालेल्या कोणत्याही घरांचे विस्थापन होणार नाही, असे आश्वासन भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले. सर्वे क्रमांक 175 ए मधील रहिवाशांच्या प्रश्‍नासंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी शहरातील आठवडे बाजारासाठी भारत मिलच्या जागेचे 1968 मध्ये विस्थापन करून दिनदयाळ नगरात 199 लोकांचे पुर्नवसन करण्यात आल्याने आता पुन्हा महामार्ग कामासाठी या पुर्नवसीतांचे पुन्हा विस्थापन करू नये, अशी व्यथा नागरीकांनी मांडली होती.

चंद्रकांत चौधरींसह नागरीकांनी मांडली व्यथा
भारतीय राजपत्रातील भुसावळ नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 175 ए मधील नगरपालिका दवाखान्याच्या जमीन अधिग्रहणाबाबत उल्लेख करण्यात आला असून सोमवारच्या सुनावणीत सर्वे क्रमांक 175 ए मधील रहिवाशांनी आक्षेप नोंदवला. सर्वे क्रमांक 175 ए वरील 199 लोकांचे यापूर्वीच पूर्नवसन झाले असून 1968 मध्ये आठवडे बाजारासाठी भारत मिलची जागा अधिगृहीत करण्यात आली. यावेळी तेथील लोकांचे विस्थापन करून सध्याचे दीनदयाळ नगर उभे राहिले आहे मात्र आता महामार्गाच्या वाढीव कामासाठी पुन्हा या घरांचे विस्थापन करू नये, अशी व्यथा सर्वोदय मंडळाचे चंद्रकांत चौधरी आदींसह रहिवाशांनी मांडली असता प्रांताधिकार्‍यांनी विस्थापन करण्यात येणार नाही, असे सकारात्मक आश्‍वासन दिले.

अतिरीक्त जमीन घेतली जात असल्याच्या तक्रारी
शहरी भागातील जमिनीला ग्रामिण भागाचे दर देणे, तसेच भुमीसंपादनानंतर जमिनीचे महामार्ग गेल्याने दोन भाग होणे यामुळे शेतकर्‍यांनी गार्‍हाणे मांडले. यासह मोजमापापेक्षाही कोठे अतिरीक्त जमिन घेतली जात असल्याच्याही तक्रारी मांडल्या गेल्या. वाढीव भूमीसंपादनाच्या अधिसूचनेमुळे संपादीत जमिनींच्या तालुक्यातील जमीन मालकांनी यावेळी उपस्थिती दिली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !