डॉ.नी.तु.पाटील यांची उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी निवड


भुसावळ : भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ.नी.तु.पाटील यांची मंगळवारी भाजप वैदयकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी निवड केली. यात समन्यवक, सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक व सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र कार्यकारीणीत संयोजकपदी डॉ.प्रशांत पाटील यांची तर सहसंयोजक पदी डॉ.श्रीराम भतवाल, भुसावळचे डॉ.नी.तु.पाटील, डॉ.योगेश पाटील आणि डॉ.रघुनाथ नामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ.नी.तु. पाटील हे मुळचे तालुक्यातील तळवेल येथील असून 2007 पासून ते पक्षाचे सक्रीय सदस्य आहेत. शिक्षण घेत असतांना 2010 पासून चिपळूण येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेपासून सुरवात झाली. नंतर भारतीय जनता युवा मोर्चा चिपळूण शहर सरचिटणीस, युवा मोर्चा जळगाव जिल्ह्या उपाध्यक्ष, प्रदेश सदस्य, व भाजप वैद्यकीय आघाडी जिल्ह्या कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर सेवा दिली आहे.या नियुक्तीबद्दल माजी वैदयकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !