जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 261 रुग्ण आढळले
जिल्हावासीयांना दिलासा : कोरोना बाधीतांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक : जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 47 हजार 907 वर
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी 261 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 47 हजार 907 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 09 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1175 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 39 हजार 631 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 878 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधीतांपेक्षा बर्या होणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 28
जळगाव ग्रामीण 04
भुसावळ 26
अमळनेर 32
चोपडा 16
पाचोरा 09
भडगाव 07
धरणगाव 19
यावल 04
एरंडोल 03
जामनेर 21
रावेर 29
पारोळा 07
चाळीसगाव 39
मुक्ताईनगर 11
बोदवड 04
अन्य जिल्हा 02


