टाकरखेड्याचे डॉ.महेश महाजन नीटच्या सुपर स्पेशलिटी परीक्षेत देशातून व्दितीय


यावल : तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी डॉ. महेश सुनील महाजन यांनी नुकत्याच पार पडलेल्या नीटच्या सुपर स्पेशलिटी परीक्षेत देशातून दुसरा क्रमांक पटकावला. डॉ.महेश महाजन यांनी अत्यंत साधारण परीस्थितीत एमबीबीएसचे शिक्षण नायर हॉस्पिटल, मुंबई येथे घेतले व त्यानंतर त्यांनी आंबेजोगाई कॉलेजला येथे न्यूरोलॉजीस्ट न्यूरोसर्जन अशा पदवी संपादन केल्या. वैद्यकीय क्षेत्रात यु.जी.पी.जी. ते सुपर स्पेशलिटी या खडतर प्रवासातील सर्वोच्च अंतिम टप्प्यात ते पोहोचले. समाजातून त्यांनी एस. एस. डॉक्टर होण्याची इच्छा प्रगट केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असताना निरुत्तर फाउंडेशन, टाटा मेमोरियल अशा वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या नामांकित संस्थांकडून त्यांना गुणवंतेच्या आधारावर लाखो रुपयांची शिष्यवृत्तीदेखील मिळाली आहे. तेव्हा अशा प्रकारे नीटच्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याने टाकरखेडा गावासह तालुक्यातून अभिनंदन होत. ते डॉ.महेश महाजन हे जीवन प्राधिकरण विभागात लिपिक सुनील रतन महाजन यांचे सुपूत्र तर टाकरखेडा येथील विकास रतन महाजन यांचे पुतणेे आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !