यावल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा


संभाजी ब्रिगेडची यावल तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

यावल : यावल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे यावल तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

विविध मागण्यांचा निवेदनात समावेश
निवेदनाचा आशय असा की, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, पीक कर्जासाठी बँक अनावशक कागदपत्राची मागणी करीत असून ते बंद करून शेतकर्‍यांना आवश्यक असतील एवढीच कागदपत्रे मागून घ्यावी व तत्काळ शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्ज माफी योजनेत पात्र असलेल्या अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना लवकरात लवकर पीक कर्जाचा लाभ मिळावा, कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवावी, शेतकरी धोरण विधेयक शेतकरी विरोधी असून ते कायमस्वरुपी रद्द करावे, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तत्काळ देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील, संतोष पाटील, उमेश पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !