शिरपूरचे प्रसिद्ध उद्योगपती तपणभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू


शिरपूर : यप्रसिद्ध उद्योगपती व शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे बांधकाम सभापती तसेच आमदार अमरीशभाई पटेल यांचे पुतणे तपणभाई मुकेशभाई पटेल यांचे वाहन मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजकाला धडकल्याने पटेल यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

आज होणार अंत्यसंस्कार
सावळदे निम्स कॅम्पसमधून (एम.एच.18 ए.एक्स.8) या मर्सिडीज कारने घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण आहे की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरीयल हॉस्पिटलला आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांचा अंत्यविधी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार स्व.मुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होय. माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होय.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !