देवेंद्र फडणवीस म्हणाले दुसर्यांदाही मीच होणार राज्याचा मुख्यमंत्री

सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सांगता
सोलापूर : राज्यात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार असून दुसर्यांदादेखील आपणच मुख्यमंत्री होवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केल. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सोलापुरात सांगता झाली. याप्रसंगी ते बोलत हाते. यावेळी अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे सांगितले.
ईव्हीएम नव्हे तुमची खोपडी खराब
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, पण जयसिद्धेश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे?’, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित करीत ईव्हीएम खराब नाही तर तुमची खोपडी खराब आहे, अशी टीका करीत विरोधकांचा समाचार घेतला. ’पराभवानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुधारले नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवलं असं सांगतात. 2004 ते 2014 पर्यंतच्या निवडणुका ईव्हीएमवर झाल्या, या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्यात. तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, पण जेव्हा मोदींनी धोबीपछाड दिला तेव्हा ईव्हीएम वाईट झालं, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता सोहळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचा समावेश होता.
