हाथरस घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांची मागणी
भुसावळ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांनी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात आशय असा की, उत्तर प्रदेशातील हातसा येथे 19 वर्षीय तरुणीवर चार ते पाच नराधमांनी बलात्कार करून जीभ कापत पाठीचा कणा मोडला तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर या तरुणीचे उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करावी व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.

