भुसावळात भाजपातर्फे उद्या राष्ट्रपित्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
भुसावळ : गांधी जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी यावल रोडवरील राष्ट्रपिता गांधी पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष राज ुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपित्यांची जयंती तसेच महात्मा गांधी पुतळा परीसर ते शहर पोलिस ठाण्यापर्यंतच्या परीसराची स्वच्छता केली जाणार आहे. भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, सक्रिय कार्यकर्ते आणि भाजपाच्या विविध आघाड्या, युवा मोर्चा पदाधिकारी यांनी कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले आणि अमोल महाजन यांनी केले आहे.

