यावल तहसीलदारांना शिवीगाळ करीत टेबलावर फेकले पैसे


शासकीय कर्मचार्‍यांमध्ये खळबळ : एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा

यावल : शिव भोजनाचा ठेका न मिळाल्याच्या करणावरून एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकार्‍याने यावल तहसील कार्यालयात सुरू असलेल्या आढावा बैठकीत तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना शिवीगाळ करीत टेबलावर पैसे फेकल्याची घटना बुधवार, 30 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पुंडलिक बाजीराव बारी (बारीवाडा, यावल) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !