भादली खुर्दला इलेक्ट्रिक शॉक लागून एकाचा मृत्यू
जळगाव : तालुक्यातील भादली खुर्द येथे कुलरचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाला. 30 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अशोक हरचंद सोनवणे (45, भादली खुर्द) असे मयताचे नाव आहे. भादली खुर्द येथे 30 रोजी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अर्ध्या तो तासाने विद्युत पुरवठा झाल्यानंतर कुलर चालू करण्यासाठी गेले असता जवळ असलेल्या लोखंडी खिडकीला हात लागल्याने खिडकीत करंट उतरल्याने जोरदार विजेचा शॉक लागल्याने खाली पडले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे दवाखान्यात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार ईश्वर लोखडे करीत आहे. सोनवणे यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, भाऊ, दोन बहिण असा परीवार आहे.

