बोदवडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगींच्या जाळल्या प्रतिमा


खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध

बोदवड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा शहर विकास आघाडीतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा जाळून संताप व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेनंतर भेट देण्यासाठी खासदार राहुल गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले व त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने या घटनेचा बोदवडमध्ये निषेध करण्यात आला. ही घटना अत्यंत घृणास्पद असून देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला जात असून उत्तर प्रदेशातीलल योगी आणि केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश सुभाष पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, काँग्रेस शहराध्यक्ष शेख मेहबूब भाई, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक डॉ. सुधीर पाटील, राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष लालसिंग पाटील, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष विनोद मायकर, नीना पाटील, मुकेश बर्डे, योगेश पाटील, सुभाष देवकर, दीपक माळी, सचिन पाटील, अमोल व्यवहारे व कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !