भुसावळात न्हावीच्या इसमाची आत्महत्या
भुसावळ : यावल तालुक्यातील न्हावी येथील विरेंद्र रामा कोळी (40) यांनी तापी नदीच्या पूलावरून उडी घेत आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी 8.30 वाजेच्या पूर्वी ही घटना घडली. कोळी यांनी दुचाकी तापी पुलावर लावत थेट तापी पात्रात उडी घेतली व खडकावर पडल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. दुचाकीवरील क्रमांकही अस्पष्ट असल्याने ओळख पटविण्यास अडचणी आल्या तर शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व हवालदारमोहंमद अली सय्यद, विशाल साळुंखे, चंद्रशेखर गाडगीळ आदींनी धाव घतली. मृतदेह बाहेर काढल्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. धनराज मंगल कोळी यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

