भुसावळात पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण


रोटरी क्लब ऑफ भुसावळ व रेल्वेचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ आणि रेल्वेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी डीआरएम विवेककुमार गुप्ता आणि एडीआरएम मनोज सिन्हा तसेच रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. भुसावळ रेल्वे स्टेशनच्या दक्षिण बाजूच्या फिरत्या क्षेत्राजवळील हा छोटेखानी कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
सीनियर डी.एम.ई.लक्ष्मीनारायण, सीनियर डीएसओ एन.के.अग्रवाल व रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने स्वच्छता अभियान सप्ताह 2020 च्या अंतर्गत रेल्वे प्रशासन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन स्टेशन डायरेक्टर गोपीनाथ अय्यर यांनी केले. याप्रसंगी रेल्वेचे ए.डी.एम.ई. शेख असलम जावेद, युनूस अन्सारी, स्टेशन सेक्शन इंजिनिअर आर.एन.देशपांडे, सी.एच.आय जोयदीप रॉय व एस.एम.मनोज श्रीवास्तव आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्याकडून रोटेरियन राधेश्याम लाहोटी, सतीश अग्रवाल, गोपाल तिवारी, हेमंत नाईक, राजेंद्र कुमार फेगडे, महेश भराडे, विकास कात्यायानी, राजेश जोशी, प्रकाश ठाकूर, बोधराज चौधरी, मदन बोरकर, गोपीनाथ अय्यर, रोटरीचे अध्यक्ष गजानन ठाकूर व मनोज गुलईकर हे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !