खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा भुसावळात निषेध
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे प्रशासनाला निवेदन
भुसावळ : उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेनंतर भेट देण्यासाठी खासदार राहुल गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले व त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने या घटनेचा भुसावळातील जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त करीत प्रशासनाला निवेदन दिले आहे. दलित समाजातील तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिची जीभ छाटण्यात आली तसेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू ओढवल्यानंतर पीडीतेच्या कुटुंबियांना मृतदेह न दाखवता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले व या घटनेचा निषेध करण्यासह त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी खासदार राहुल गांधी जात असताना त्यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आल्याने जिल्हा अनुसूचित विभागातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागाचे समन्वयक व नाशिक शहरचे निरीक्षक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, अनुसूचित विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, असंघटीत कामगारचे जिल्हाध्यक्ष गणेश बारसे, ईस्माइल पहेलवान, अॅड.शरद तायडे, जावेद अहमद महेबूब खान, तस्लीम पहेलवान, गफुर गवली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

