भुसावळात रस्त्यावर गोंधळ घालणार्या बारा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या जवळ असलेल्या एम.एच.फिटनेस जीमजवळ काही युवकांमध्ये वाद झाल्याने ते गोंधळ घालत असल्याने बाजारपेठ पोलिसांनी फिर्यादी होत बारा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला. शहरातील जामनेर रोडवरील फिटनेस जीमवळ बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास काही मुलं गोंधळ घालत असून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळतात तत्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी बलजीतसिंग गील, गिरीश तायडे, योगेश तायडे, आनंद सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, जयदीप सूर्यवंशी, मंगेश काळे, हर्षल सोनार, ऋषी शुक्ला यांच्यासह दोन ते तीन अनोळखी जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी तुकाराम नेटके यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

