भुसावळात 200 बेडचे कोविड हॉस्पीटल उभारावे


भुसावळचे नगरसेवक पिंटू ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : भुसावळ शहरात दिवसागणिक वाढणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यांच्यावर प्रभावीपणे उपचार होण्यासाठी शहरात 200 बेडचे अत्याधूनिक कोविड हॉस्पीटल उभारावे, अशी मागणी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जळगावनंतर भुसावळात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रुग्णांवर उपचार होण्यासाठी शहरात अत्याधूनिक कोविड हॉस्पीटलची नितांत आवश्यकता असल्याने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

खाजगी कर्मचार्‍यांचा काढावा विमा
नगरसेवक ठाकूर यांनी खाजगी रुग्णालयात काम करणार्‍या परीचारीका, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी तसेच स्वयंसेवक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास शासनाने त्यांचा विमा काढावा, अशी मागणी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !