जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 322 रुग्ण आढळले
एकाच दिवसात 889 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 48 हजार 806 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 322 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 806 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 42 हजार 343 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 1191 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी एकाच दिवशी 889 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 69
जळगाव ग्रामीण 09
भुसावळ 28
अमळनेर 14
चोपडा 25
पाचोरा 17
भडगाव 16
धरणगाव 04
यावल 14
एरंडोल 05
जामनेर 06
रावेर 05
पारोळा 06
चाळीसगाव 19
मुक्ताईनगर 77
बोदवड 06
अन्य जिल्हा 02


