यावल तालुक्यात पावसाचा पुन्हा ज्वारी, कपाशीसह केळीला फटका
वीज तारा तुटल्याने नवीन वसाहतीत अंधार : नुकसानीच्या भरपाईची माणी
यावल : यावल शहरासह परीसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या जोरदार मुसळधार पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसाने ज्वारीसह कपाशी तसेच केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावल फैजपूर रोडवरील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यालगत मोठे झाड पडल्याने यावल-फैजपूर रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता तसेच बसस्टँड जवळील नवीन वसाहतीत असलेल्या हॉटेल पूर्णब्रह्म समोरील झाड विद्युत खांब्यावर पडल्याने तेथील तारा तुटल्याने शहरातील विद्युत पुरवठा प्रभावीत झाला तर नवीन वसाहतीत विद्युत तारांवर झाड पडून तारा तुटल्यामुळे नवीन वसाहतीतील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यावल परीसरातील शेती भागातील विद्युत तारा देखील मोठ्या प्रमावर तुटल्याचे सांगणयात आल्याने शेतांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज कंपनीचे अभियंता डमाळे सव सर्व कर्मचार्यांकडून युद्धपातळीवर विद्युत तारा जोडण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

