राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्रींना अभिवादन


भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन : भाजपातर्फे शेतकरी मेळावा तसेच स्वच्छता अभियानातून जनजागृती

भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपाने रावेरात शेतकरी मेळावा घेत स्वच्छता अभियान राबवले तर भुसावळातही भाजपा पदाधिकार्‍यांनी स्वच्छता अभियानातून जनजागृती केली. शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडक शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी थोर पुरूषांच्या कार्याचा महिमा सांगितला.

भुसावळ तालुका काँग्रेस कमेटी
भुसावळ : भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. केंद्रातील लहरी भाजप शासनाकडून शेतकरी विरोधी विधेयक त्वरीत रद्द करावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले तसेच उत्तर प्रदेशातील हाथरथ येथे जाणार्‍या खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रहिम कुरेशी, भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील, भुसावळ तालुका सरचिटणीस विवेक नरवाडे, तालुका उपाध्यक्ष राजू पालिमकर, ईस्माईल गवळी, जयंत सुरपाटणे, सुदर्शन जाधव, शिवाजी पाटील, अ‍ॅड.शरद तायडे, ज्ञानेश्वर पाटील, मनोज चव्हाण, अतुल पाटील, मनिषा जवरे, कुणाल सुरळकर, विक्रम वानखेडे आदी उपस्थित होते.

भुसावळ भाजपातर्फे स्वच्छता अभियान
भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त यावल नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आल्यानंतर स्वच्छता अभियान राबवण्ययात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, माजी प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेलअजय भोळे, प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.निलेश पाटील आदींच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळा परीसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, शैलजा पाटील, नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे, प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, किरण कोलते, राजेंद्र नाटकर, किशोर पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, विशाल जंगले, प्रशांत नरवाडे, कुंदन ढाके, गणेश माळी, प्रमोद सावकारे, प्रशांत पाटील, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, बिसन गोहर, राजु खरारे, अनिरुद्ध कुलकर्णी, नंदू बडगुजर, चेतन बोरोले, संदीप सुरवाडे, सुरेश कुटे, नारायण रणधीर, रमाशंकर दुबे, सुनील महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालय
भुसावळ : थोर पुरूषांच्या जयंतीनिमित्त दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.जी.पी.वाघूळदे, रा.से.यो.विभागीय समन्वयक प्रा.अनिल सावळे, डॉ.दयाधन राणे, डॉ.आर.एम.सरोदे आणि प्रा.अंजली पाटील उपस्थित होते.

रावेर तहसील कार्यालय
रावेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात प्रशासनातर्फे प्रमिा पूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळ अधिकारी सचिन पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र करोडपती, लोळपे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !