गुन्हेगारी नियंत्रणासह जनतेत समन्वय गरजेचा


अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव : पदभार स्वीकारला

धुळे : जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासह गुन्हेगारी नियंत्रणावर भर द्यावा तसेच जनता व पोलिसांमध्ये समन्वय गरजेचा असल्याची भावना जिल्ह्याचे नूतन अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी व्यक्त केली. धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांची अमरावती नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळे पोलिस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जगन्नाथ बच्छाव यांची बदली करण्यात आली होती. बच्छाव यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

प्रलंबित गुन्ह्यांचा घेतला आढावा
अधिकार्‍यांच्या बैठकीत अपर अधीक्षक बच्छाव यांनी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासह पसार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले तसेच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासह पोलिसांची गस्त वाढवण्याच्या सूचनाही केल्या. सर्वसामान्य जनता व पोलिसांमध्ये समन्वय अत्यंत गरजेचा असून पोलिस ठाण्यात आलेल्या नागरीकांना सन्मानाची वागणूक द्या, त्यांच्या तक्रारी, अडचणी समजून घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !