कन्हाळा शिवारात दारू अड्ड्यांवर धाड


भुसावळ : भुसावळ तालुका पोलिसांनी शिवपूर कन्हाळा शिवारातील नाल्याजवळ गावठी दारू भट्टीवर धाड टाकत संशयीत आरोपी झाकीर हुसेन गवळी (रा.कन्हाळा) याच्या ताब्यातून पाच ड्रम गावठी हटभट्टीची दारू गाळण्याचे गूळ मोह नवसागर मिश्रित कच्चे रसायन नष्ट केले तसेच 20 लीटर तयार दारू मिळून 30 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील, रीयाज काझी, होमगार्ड अमोल जयकर, विनोद सपकाळे, जगदीश पाटील आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !