गुरूकुल अध्यक्षांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
सावदा : श्री स्वामीनारायण भगवान यांचे तत्वज्ञान,भक्ती, सत्संग आपल्या गोड व अमोघ वाणी, कथा प्रवचन द्वारा गावागावात, घराघरात, मनामनात, प्रत्येकाच्या हृदयात पोहोचवून जीवन कसे जगावे ? याचे अनमोल मार्गदर्शन करणार्या श्री स्वामी नारायण गुरुकुलचे अध्यक्ष प.पू. स.गु शास्त्री भक्ती प्रकाशदासजी (सावदा) यांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रसंगी प.पू.शास्री यांनी आमदार पाटील यांना आशीर्वाद देत त्यांचा सत्कारही केला. प्रसंग शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, धनंजय चौधरी, शाम पाटील, भरत नेहते, गोपाळ सोनवणे उपस्थित होते.

