लोकनेते स्व.हरीभाऊ जावळेंमध्ये होती सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालण्याची ताकद
मेजर किशोर सोनार : वरणगावात शहरात वृक्षारोपण
वरणगाव : लोकनेते स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त वरणगावातील नगराध्यक्ष सुनील काळे मित्र मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मेजर किशोर सोनार म्हणाले की, स्व.हरीभाऊ जावळे हे असे लोक नेते होते की त्यांची बरोबरी आजपर्यंत होऊ शकलेली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याची ताकत हरीभाऊंमध्ये होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव शहरात वृक्षरोपणास सुरवात केली असून असंख्य झाडे लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा कार्यकर्ते संजय सोनार, बंटी सोनार, हितेश चौधरी, नरेंद्र बावणे, कमलाकर मराठे, छोटू सेवातकार, संजय बेदरकर, विक्रांत चांदेलकर, विवेक कुलकर्णी, शंकरअण्णा पवार, आकाश निमकर, अमन चंदले, राहुल जंजाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

