पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार शिरीष चौधरींकडून पाहणी
यावल : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पाऊस आणि वार्या मुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, 1 व 2 रोजी यावल, सातोद, काठोरा, चितोडा या शिवारात वादळाने झालेल्या शेती नुकसानाची पाहणी करताना आ.शिरीष चौधरी यांनी यावल तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन परिस्तिथीचा आढावा घेतला. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास सादर करा व शेतकर्याला कशी मदत करता येईल ते बघा असे आदेश आ.चौधरी यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांना दिले. याप्रसंगी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, पं.स.सदस्य शेखर पाटील, जितेंद्र कुंवर (तहसीलदार), सुभाष शेकोकार कृषी अधिकारी, सागर शिनारे, सुजाता कांकळ, अनिल महाजन, अनिल पाटील, रमेश पाटील, प्रसन्न महाजन, मिठाराम महाजन, महेंद्र धांडे, विकास पाटील, कुमार महाजन, धीरज कुरकुरे, भोजराज पाटील, हिरामण धनगर, रंजन तळेले, ज्ञानदेव पाटील, हेमंत पाटील, ललित पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

